Google Ad
Editor Choice Pune

सोन्याच्या बनावट अंगठया बनवून विकणारे दोघेजण गजाआड … लोणीकंद पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज : तांब्याच्या – चांदीच्या तारांना सोन्याचा मुलामा देऊन सोन्याच्या बनावट अंगठया विकणारा व बनावट अंगठी तयार करणारा कारागीर अशा दोघांना लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले आहे . त्यांच्याकडून १६ बनावट अंगठया , हॉलमार्क करण्याचे साहित्य , दागिने बनविणारी मशीन असा एकूण साडे तीन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे . पंकज अशोक टाक ( वय ३७ , रा . पिंपरी चिंचवड ) असे बनावट अंगठया विकणारा व बिलाल उर्फ बिल्ला फिरदोस शेख ( वय ३१ , रा . चिंचवड ) असे दागिने बनविणाऱ्या कारागिराचे नाव आहे .

दोघांनाही पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे . पोलिसांनी दिलेल्यामाहिती नुसार , आंबेगाव बुद्रुक येथील प्रवीण गायकवाड यांना फेब्रुवारी मध्ये पंकज टाक याने एक तोळ्याची सोन्याची अंगठी पेरणे फाटा येथे २७ हजार रुपयांना विकली होती . सदरची अंगठी मोडण्यासाठी सोनाराकडे गेले असता अंगठीला दोन ग्रॅम सोन्याचा मुलामा व आतमध्ये चांदीची तार असल्याचे समजले . फसवणूक झाली असल्याचे समजताच गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली . लोणीकंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध शाखेने पंकज टाक याचा शोध घेत असताना टाक व सोन्याचे दागिने बनविणाराकारागीरबिल्लाशेख या दोघांना पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले .

Google Ad

त्यांनी अशाच प्रकारच्या बनावट अंगठया अनेक जणांना विकल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे . त्यांच्याकडून १६ बनावट अंगठया , हॉलमार्क करण्याचे साहित्य , दागिने बनविणारी मशीन असा एकूण साडे तीनलाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . अशाच प्रकारे बनावट अंगठी देवून फसवणूक झाली असल्यास लोणीकंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे . सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर , गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक हणमंत पडळकर , बाळासाहेब सकाटे , संतोष कुलथे , श्रीमंत होनमाने , संतोष मारकड , ऋषीकेश व्यवहारे , सूरज वळेकर , दत्ता काळे , समीर पिलाणे यांनी केली आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

43 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!