Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आय.पी.एल.क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्रुतुराज गायकवाड यांचा सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज : पार्थ पवार फौंडेशनच्या वतीने आय.पी.एल.क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्रुतुराज गायकवाड यांचा सन्मान तसेच यावेळी आर्दश माता पिता पुरस्कार सौ.सविता गायकवाड व दशरथ गायकवाड यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजित सिंह कोचर व राजाभाऊ बनसोडे नगरसेवक पिंचिंमनपा व रविंद्र बाईत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तसेच यावेळी क्रिडा शिक्षक व खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला, करोना महामारी च्या काळात क्रिडा सेवा करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

अशिष उबाळे, सुनील साठे,योगेश बोराडे,गणेश जाधव,सुचित्रा कांबळे पराग ओगळे रिबेका दास राजाभाऊ बनसोडे नगरसेवक पि.चि.मनपा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आपल्या पिंपरी चिंचवड विभागतुन भारतीय संघात निवड व्हावी असा उदयोन्मुख खेळाडू त्रुतुराज तयार झाला असून भारतीय संघात निवड होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी निलेश हाके,अँलेक्स दास,मोशिन शेख,नरेश सुतार, लक्ष्मण उपार,रूपेश सारसर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत व आभार प्रदर्शन अक्षय कळसकर यांनी केले.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!