Google Ad
Editor Choice

सांगवी मधील सामाजिक कार्यकर्ते ‘दत्तात्रय आनंदराव भोसले’ (शिवामृत ग्रुप) यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील रहिवासी व शिवामृत वॉशिंग सेंटरचे (शिवामृत ग्रुप) मालक कै. दत्तात्रय आनंदराव भोसले (वय५५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी (१५मे) रात्री ९ .३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्

दत्तात्रय भोसले यांच्या निधनाची माहिती कळताच सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. मूळचे बारामती तालुक्यातील तांदळी गावचे असलेले दत्तात्रय भोसले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-सून, एक भाऊ – वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.

Google Ad

सांगवी, नवी सांगवीतील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ‘दत्तात्रय भोसले’ यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची गावात ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

117 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!