Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी … तानाजी जवळकर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७सप्टेंबर) :: पिंपळे गुरव येथील तानाजी जवळकर सोशेल फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आशिर्वाद गौरी गणपतीचा’ या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज (दि.१७) रोजी घेण्यात आला.

कोरोनाच्या संकट काळात महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे, त्यांना या नैराश्यातुन बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेतृत्व तानाजी जवळकर व तृप्तीताई जवळकर परिसरात नेहमीच अग्रभागी असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी परिसरातील महिला भगिनींकरिता ‘आशिर्वाद गौरी गणपतीचा‘ या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आज पिंपळे गुरव येथे पार पडला.

Google Ad

या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघिरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, वैशाली काळभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

यावेळी बोलताना ‘संजोग वाघिरे’ म्हणाले, तानाजी जवळकर हे नेहमीच आपल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी करीता धावून जातात, कोरोनाच्या संकट काळात त्यांनी औषधे वाटप , मोफत रुग्णवाहिका सेवा नागरिकांकरीता उपलब्ध करून दिली, आणि आता महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

यावेळी शाम जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, पै. गणेश जगताप, शोभाताई आदियाल, सामाजिक कार्यकर्ते अंकुशआप्पा जवळकर,मुकेश पवार, मधुकर रणपिसे, बाळासाहेब काशीद, जितेंद्र जवळकर, अतुल काशीद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय कदम यांनी केले,तर अमर आदियाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

73 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!