Google Ad
Editor Choice Technology

सुट्टीवर असताना ऑफिसचे मेसेज वाचायचा कंटाळा येतो ? WhatsApp वर तुमच्यासाठी येतंय हे फिचर

महाराष्ट्र 14 न्यूज : व्हॉट्सॲप (WhatsApp) हा वैयक्तिक आणि ऑफिसची कामं या दोन्ही गोष्टींसाठी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बऱ्याच वेळा आपल्या ऑफिसची कामे व्हॉट्सॲपद्वारे सोप्या पद्धतीने होण्यास मदत होते. परंतु आपण जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा ऑफिसचे मेसेज वाचण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो. याचसाठी व्हॉट्सॲप आता एक नवीन फिचर घेऊन येणार आहे.

सुट्टीच्या दिवशी कामाचे मेसेज टाळता यावेत यासाठी व्हॉट्सॲप आता ‘व्हेकेशन मोड’ नावाच्या एका नवीन फिचरची चाचणी करत आहे. या फिचरद्वारे तुम्ही एखादं कन्वर्सेशन काही काळाकरता डी – ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यामुळे तेवढा कालावधीसाठी तुम्हाला त्या व्यक्तीकडून कुठलेही मेसेज येणार नाहीत.

Google Ad

व्हेकेशन मोडद्वारे एखादं चॅट डी-ॲक्टिवेट करण्यासाठी युझर्सना प्रथम ते चॅट archive करावं लागणार आहेत. यानंतर व्हेकेशन मोड ऑन केल्यानंतर वापरकर्त्यांना त्या चॅटचे कुठलंच नोटिफिकेशन आपल्या व्हॉट्सॲप इनबॉक्समध्ये पाहता येणार नाहीत. तसंच जोपर्यंत व्हेकेशन मोड ऑफ करून त्या चॅटला आपण Unarchived करणार नाही तोपर्यंत त्याच्याकडून आपल्याला कुठलेही मेसेज येणार नाहीत व तो चॅट म्यूट ऑप्शनवर राहील.

असे करून आपण कन्वर्सेशन केवळ काही काळाकरता थांबवू शकतो जोपर्यंत वेकेशन मोड ऑन असेल तोपर्यंत आपल्याला त्या चॅटमधून कुठलेही मेसेज येणार नाहीत. ज्यावेळी आपल्याला त्यांच्याशी पुन्हा संपर्क करायचा असेल तेव्हा आपण वेकेशन मोड ऑफ करून नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. जरी हे फीचर ऐकायला व वापरायला युझर्सना खूपच सोपं वाटत असेल तरी दुर्दैवाने केवळ हे व्हॉट्सॲप चाचणीच्या टप्प्यावर आहे.

हे व्हॉट्सॲपमध्ये कधी ॲड होईल याबाबत अजून कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही. नुकतेच व्हॉट्सॲपने परमनंटली म्यूटिंग ग्रुप चॅट आणि डिसअपिअरिंग मेसेज हे दोन फीचर्स युझर्ससाठी उपलब्ध करून दिले. भविष्याचा विचार करून व्हॉट्सॲप आता व्हेकेशन मोड या नवीन फिचर बाबतीत विचार करत आहे व त्याच्या चाचण्या सुरू आहेत. हे खूपच चांगली गोष्ट आहे की व्हॉट्सॲप आपल्या युझर्सचा विचार करून नवनवीन फीचर्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. यामुळे भविष्यात व्हॉट्सॲप वापरणे हे अजूनच सुलभ आणि सोपे होणार आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

49 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!