Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

तुझ्या अंगावर वर्दी आहे, नाहीतर इथे दाखवलं असतं, वर्दी उतरव आणि ये ‘ … पिंपरी चिंचवडमध्ये पहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत असते, शहरात तोडफोडीचे सत्र सुरु असून त्यात आता पोलिसांच्या अंगावर धावून पोलिसांना दमदाटी आणि अश्लील शिवागाळ केल्याचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

Google Ad

सांगवी पोलिस कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता विनामास्क दुचाकीवर निघालेल्या दोघांना पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात आडवले. ते पोलिसांच्या कर्तव्याचा एक भाग आहे, परंतु त्यावेळी आरोपीने पोलीसाला थेट अंगावर धावून जात आरेवारी करत थेट पोलिसांची कॉलर धरुन अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केली. अरेरावीची भाषा वापरली ‘तुझ्या अंगावर वर्दी आहे नाहीतर इथे दाखवलं असतं’, अशा पद्धतीने आरोपी पोलिसांना धमकवतही होता. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

 

अभिषेक राजू टेंकल आणि हरिश गणेश कांबळे अशी आरोपींची नावे असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नागरिकांचे हक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत ती अशा काळात पाळणे जरुरीचे आहे, नाहीतर अशा कारवाईला सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की!

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!