Google Ad
Editor Choice Pune

Pune : प्रेमात झाला मजनू अन … तिच्या घराबाहेर म्हणू लागला गाणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : एकतर्फी प्रेमात मजनू झालेल्या तरुणाने तरुणीच्या घराबाहेर फिल्मी गाणी म्हणत राडा घातला . ही घटना मीठगंज पोलिस चौकीजवळ घडली . राडा घालणाऱ्या तरुणाला तक्रारीनंतर खडक पोलिसांनी अटक केली आहे . शोहेब समीर तांबोळी ( वय २१ ) रा.खडक असे अटक आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे .

शोहेब तांबोळी हा कोणताही कामधंदा करत नाही . तो फिर्यादी तरुणी क्लासला जाताना नेहमी तिचा पाठलाग करत होता . तिला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत होता . तिने त्याला कोणताच प्रतिसाद न दिल्यावर चिडलेल्या शोहेबने तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली . या धमकीलाही फिर्यादीने भिक घातली नाही . यामुळे तिच्या प्रेमात वेडा झालेल्या शोहेब ह्याने तडक तिचे घर गाठले . तिथे त्याने चित्रपटातील प्रेमगीत गात तरुणीला साद घातली .

Google Ad

मात्र , त्याला तिथेही कोणताच प्रतिसाद मिळला नाही . यामुळे तो आणखीनच बिथरला . गाणी म्हणता म्हणता तो अश्लिल इशारेही करु लागला . त्याच्या अश्लिल इशाऱ्यांमुळे फिर्यादी व आजूबाजूच्या महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली . यामुळे फिर्यादीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली . तक्रार प्राप्त होताच त्याला खडक पोलिसांनी अटक केली . या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक आजेवागकर करत आहेत .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!