Google Ad
Editor Choice

इंद्राणीनगर प्रभाग क्रमांक ८ इंद्राणीनगर वरुन बालाजीनगर कडे जाणाऱ्या रोडवरील अंदाजे पंधरा वीज खांबावरील वीज… दोन महिन्यापासून बंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका इंद्राणीनगर प्रभाग क्रमांकः ८ इंद्राणीनगर वरुन बालाजीनगर कडे जाणाऱ्या रोडवरील अंदाजे पंधरा वीज खांब अंदाजे दोन महिन्यापासून बंद आहे? प्रशासन नक्की कोणाच्या तक्रारीची वाट बघत आहे? आणि अशा अंधारात काही घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका? तसेच इंद्राणीनगरच्या बाजूला असलेल्या एम आय डी सी मधील अनेक वीज खांब कित्येक महिन्यापासून बंद आहे? प्रशासनाचे जबाबदार अधिकारी कायम फिरती वरती असताना देखील एवढे वीज खांब बंद कसे? आश्चर्याची बाब आहे विचार करण्यासारखी बाब आहे? त्वरित बंद असलेले वीज खांब चालू करण्यात यावे? प्रशासनाने नागरिकांना घातपात पासून वाचवावे? असे अनेक प्रश्न नागरिक करत आहेत. म्हणजेच अंधाराच्या ठिकाणी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे केली आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement