Google Ad
Uncategorized

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीसाठी आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार कार्यक्षेत्रात विविध जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
    त्याअनषंगाने २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुक मतदानासाठी आज विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.
 आज मुंबई पुणे महामार्गावरील फुगेवाडी कार्यक्षेत्रात विविध सोसायट्या, व्यापारी केंद्रे, दुकाने,आयुष्मान आरोग्य केंद्र आदी विविध ठिकाणी मतदान मार्गदर्शिका वाटप करण्यात आल्या.
   या मतदान मार्गदर्शकेत भारत निवडणूक आयोगाचे विविध ॲप, मतदार नोंदणी,मतदार सहाय्यता क्रमांक, मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया, तेथील प्रक्रियेची रचना, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांचेकरीता मतदान केंद्रांवर उपलब्ध सोईसुविधा,मतदानासाठी आवश्यक पुराव्यार्थ कागदपत्रे, टपाली मतदान यासह सविस्तर माहिती तसेच मतदान शपथेचाही समावेश आहे.
 दरम्यान फुगेवाडी येथील जय महाराष्ट्र कुस्ती संकुलातील मतदारांना व मार्गदर्शिकांचे वाटप करीत असता तेथील मूकबधिर पहिलवान आणि नवोदीत मतदार अक्षय पाटील यांच्याशी नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सांकेतिक भाषेत संवाद साधला असता त्याने उद्या सांगली येथील पेठ इस्लामपूर येथे सकाळी जाऊन मतदान करणार असल्याचे सांगितले,त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच मतदान करणार असल्याबाबत उत्साह आणि आनंद दिसून आला.
    फुगेवाडी येथील काही व्यापारी केंद्रांवर मतदान मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्यांनीही येणा-या ग्राहकांना मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात येईल तसेच मतदानासाठी जनजागृती केली जाईल असे सांगून लोकशाही उत्सवात सहभागी करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!