Google Ad
Editor Choice Maharashtra

… तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील ; लेखिका ज्वेलर्स वादात संजय राऊतांची उडी

महाराष्ट्र 14 न्यूज : लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सविरोधात आता शिवसेनेनेही आवाज उठविला आहे .

‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील.’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला. कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली होती.

Google Ad

दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली, पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद साधला. सराफा व्यापाराने माफी मागितली आहे. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना ‘मातोश्री’च्या आठवणींना उजाळा दिला .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

376 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!