Google Ad
Editor Choice Pune

Pune : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या दंडाची रक्कम पोलिसांच्या आणि पालिकेच्या तिजोरीत फिफ्टी फिफ्टी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला. करोना संकटकाळात विना मास्क फिरणाऱ्या ६५ हजार नागरिकांवर पालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली असून , साडेतीन कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे . हा दंड पुणे महापालिका आणि पुणे पोलिस फिफ्टी फिफ्टी वाटून घेणार आहेत .

या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली . त्यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून वसुल केलेल्या दंडातील निम्मी रक्कम शहर पोलिसांच्या , तर निम्मी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे . करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे , तसेच सुरक्षित वावराच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे . मात्र , साथीचा प्रादुर्भाव वाढत
असतानाही , अनेक नागरिक विनामास्क घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे . त्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या , सुरक्षित वावराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकेसह स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत .

Google Ad

त्यानुसार , पालिका आणि पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा केली जात आहे . पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केल्यानंतर महापालिकेची छापील पावती दिली जात आहे . या दंडवसुलीतून मिळणारी निम्मी रक्कम पोलिसांना देण्यात यावी , असा प्रस्ताव पालिकेला देण्यात आला होता . त्याला स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!