Google Ad
Editor Choice Technology

कोरोनावर बाजारात आले हे औषध … एका डोसची किंमत ६० हजार रुपये!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रोश इंडिया आणि सिप्ला या आघाडीच्या औषध कंपन्यांचे कोरोनावरील औषध बाजारात आले आहे. हे औषध अत्यंत महागडे असून याद्वारे कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार करण्याचा दावा केला जात आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत जवळपास 60 हजार रुपये आहे.

या दोन्ही नामांकित कंपन्यांनी सोमवारी भारतात रोशचे अँटिबॉडी कॉकटेल आणल्याची घोषणा केली आहे. याची किंमत 59,750 रुपये प्रति डोस आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर झालेल्या रुग्णांसाठी हे वरदान असल्याचे म्हटले जात आहे. सिल्पा आणि रोशने एक संयुक्त निवेदन सादर करत म्हटले की, अँटिबॉडी कॉकटेल (कॅसिरिविमॅब आणि इमदेविमाब) ची पहिली खेप भारतात उपलब्ध केली आहे. तर दुसरी खेप जूनच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. यामुळे दोन लाख रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतील.

Google Ad

सिप्ला देशभरात त्यांच्या मजबूत वितरण क्षमतेच्या जोरावर हे औषध वितरित करणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक रुग्णासाठी डोस किंमत 59,750 रुपये असेल. यात सर्व करही समाविष्ट आहेत. निवेदनानुसार, हे औषध प्रमुख रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. रोशचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध झाल्याने आता कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी एक शस्त्र भारताला उपलब्ध झाले आहे. परंतु याची किंमत जास्त असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

341 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!