Google Ad
Editor Choice

दि. २४ डिसेंबर आणि २५ डिसेंबर २०२२ रोजी नवी सांगवीतील पी डब्ल्यू डी ग्राऊंडवर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन

निरोगी आरोग्यासाठी • रोगाच्या निदानापासून रोग निवारणापर्यंत !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ डिसेंबर) : मागील चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येऊन सुमारे ६० ते ७० हजार रुग्ण विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेत आहेत. यंदाच्या वर्षीही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व गोर गरिब रुग्णांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्साकरिता  शनिवार  दि. २४ डिसेंबर ते रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत PWD ग्राऊंड,  सांगवी येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने मोफत  महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

सदर महाआरोग्य शिबिरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड येथून सर्व शासकीय रुग्णालय व खाजगी नामंकित रुग्णालय सहभागी होणार असून शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्याच्या संबंधित  तपासण्या व त्यानंतर सदर शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.शिबीरात होणाऱ्या तपासण्या व शस्त्रक्रिया

Google Ad

हृदय रोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण – किडणी विकार व प्रत्यारोपण , लीव्हर प्रत्यारोपण, गुड्ये प्रत्यारोपण हाडांचे व मणक्यांचे बजार हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक उपचार , त्वचा विकार , फाटलेली टाळु व ओठांवरील शस्त्रक्रिया, मोफत बॉडी चेकअप,  फिट येणे उपचार मार्गदर्शन, कान-नाक-घसा, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यावर मोफत उपचार व शसक्रिया लहान मुलांच्या हृदयावरील उपचार मोफत अंन्जोग्राफी, अपंगांना जयपुर फुट व कैलीपर्स चे मोफत वाटप तसेच मोफत डोळे तपासणी चष्मे वाटप केले जाणार आहे.

पवनाथडी जत्रेत या आरोग्य शिबिराची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!