Google Ad
Editor Choice Education

शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी सौ.ज्योत्स्ना शिंदे यांच्या गैरकारभारविरुद्ध व कार्यक्षमतेबाबत चौकशी करून तात्काळ बदली करावी. : आमदार लक्ष्मण जगताप.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७जुलै) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी सौ.ज्योत्स्ना शिंदे यांच्या गैरकारभारविरुद्ध व कार्यक्षमतेबाबत अनेक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शिक्षक व पालकांनीही वारंवार त्यांच्याकडे शाळेतील फी शुल्क वाढ, RTE प्रवेश व पद मान्यता समस्यांबाबत तक्रारी करूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येते.

पिं.चिं.मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार व अकार्यक्षमतेबाबत अनेक शिक्षक,पालक व नागरिकांनी आयुक्त, लोकप्रतिनिधी व वृत्तपत्रे प्रतिनिधीकडे तक्रारी व व्यथा मांडल्या आहेत.पिंपरी-चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षण विभागातील खरेदी, खाजगी शाळांची मान्यता, शिक्षकांचे संच मान्यता याबाबतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता करून अनेक प्रकारे आर्थिक भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सौ. ज्योत्स्ना शिंदे या सदर पदावर गतिमान व पारदर्शकपणे कारभार करत नसून त्यांना सोपविलेल्या महत्वाच्या पदाचा गैरवापर करत असल्याच्या गंभीर तक्रारी अनेक शिक्षण संस्थांनी केल्या आहेत. या सर्व गैरप्रकारामुळे व भ्रष्टाचारामुळे अकारण मनपाची प्रतिमा मलीन होत आहे.

Google Ad

मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. ज्योत्स्ना शिंदे यांच्यावर सोपविलेले सर्व कामकाज व अधिकार तात्काळ प्रभावाने काढण्यात यावेत व त्यांच्या मनपातील कारभाराची चौकशी करून चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!