Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश … पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सायबर पोलीस स्टेशन निर्माण करून रिक्त पदे भरणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांवरील उपस्थित कपात सूचना क्रमांक ११६३ अन्वये गुन्हेगारी वृत्तीचे लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांची सायबर इंटरनेट युगात वावरताना मोबाईल संगणक आणि इतर साबक सायबर उपकरणाद्वारे फसवणूक करीत असल्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड आयुक्तलय अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना सायबरबाबत जागरूकता आणि प्रशिक्षण देणे  याची मागणी केली होती.

तसेच पोलीस आणि न्याय  प्रणालीतील लोकांना सायबर गुन्ह्यांची प्रकरणे हाताळण्यासाठी बाबत प्रशिक्षण देण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत सायबर सेलची स्थापना करण्याबाबत व नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रिक्त पदे भरण्याबाबत मागणी केली असता राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला प्रस्ताव पोलीस महासंचालकांना कार्यालयाकडून प्राप्त होताच रिक्त पदे भरणे बाबत व सायबर क्राईम पोलीस स्टेशन निर्माण करणेबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!