Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शिवजयंती घरा घरात साजरी करण्याचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भाजप युवा मोर्चाचे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज या नावात अख्खा महाराष्ट्र सामावलेला आहे. सह्याद्रीचे कडेकपार, दरी, डोंगर जेवढ्या वळणघाटाने युक्त तेवढाच शिवबा ते छत्रपती शिवाजी हा संपूर्ण प्रवास व्यापलेला आहे. अगदी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र असे कित्येक विषय या एकाच व्यक्तिमत्वाभोवती गुंफलेले आहेत.

अठरापगड समाजातील प्रत्येकाला आपल्या छत्रछायेत विशिष्ट स्थान देणारा एकमेव नेता म्हणून आजही त्यांचीच छबी राजकीय पटलावर आहे. दूरदृष्टी, साहसी वृत्ती, माणसांच्या गुणांची कदर आणि न्यायाची चाड या चतुर्भूजांसह शत्रूला नामोहरम करणाऱ्या थोर राजाची जयंती १९ फेब्रवारीला प्रत्येक घरात, सोसायटीत परिसरात साजरी होईला हवी अशी भावना भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज सुदामराव लांडगे यांनी व्यक्त केली..बालसवंगड्यांसमवेत विटीदांडू खेळण्याच्या वयात रायरेश्वराला ज्यानं स्वराज्याची शपथ घेतली तो आदर्श प्रत्येक कोवळ्या मनाने घ्यायला हवा. तलवारीच्या पात्यांची धार दुर्ग, जलदुर्गांमध्येही तळपवण्याची सळसळ शालेय मावळ्यांत निर्माण व्हावी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश यादव यांनी मांडली..

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!