Google Ad
Editor Choice Entertainment Sports

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सांगवी येथील पी डब्लू डी मैदानात दिमाखात समारोप!

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे बंधू उद्योजक विजूशेठ जगताप यांच्या हस्ते चषक व पारितोषिक देऊन झाला, यावेळी उद्योजक सुभाषदादा काटे, मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, सुनील येडे, गणेश सोनवणे, उद्धव कवडे, धनंजय ढोरे स्थानिक नगरसेवक पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ०९ .०० वा. पी डब्लू डी मैदान नवी सांगवी येथे या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, यावर्षीही दि. ०६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शहरातील नामांकित क्रिकेट संघांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक संघास मयुरचे टी-शर्ट तसेच विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात अली. आमदार चषक स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात आल्या होत्या.

Google Ad


फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट, सांगवी – पिंपळे गुरव प्रिमीयर लीग आणि + 40 आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे फायनल सामने हे सोमवार दि . १५/२/२०२१ रोजी झाले, यावेळी सांगवीतील पी डब्लू डी मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दीचा दिसून आली.

यावेळी एक ओपन हाफ- पहिली सेमी फायनल – सकाळी ९ वा . दुपारी सेमी फायनल – सकाळी १०.३० वा . ४०+ फायनल- दुपारी १२ वा .सांगवी चॅम्पियन फायनल – दुपारी १.०० वा ओपन हाफ मेगा फायनल – दु .३ वा . झाले. याटेनिस बाॅल क्रिकेटचा महासंग्राममध्ये आमदार चषक २०२१ या संघांना देण्यात आले.


🥇प्रथम क्रमांक:- वरद ११ लोणावळा.

🥈व्दितीय क्रमांक:- निखिल दादा कलाटे स्पोर्टस फाऊंडेशन चिंचवड.

🥉तृतीय क्रमांक:- राहुल तरस स्पोर्टस फाऊंडेशन देहुरोड.

🏅चतुर्थ क्रमांक:- अमित पसरणीकर स्पोर्टस फाऊंडेशन सांगवी.

🏏उत्कृस्ट फलंदाज:- असिफ तांबोळी (वरद ११).

🎾उत्कृस्ट गोलंदाज:- अतुल कोकाटे (चिंचवड).

🏆फायनल मॅन ऑफ द मॅच:- राहुल सातव (वरद ११).

🏆मॅन ऑफ द सिरीज:- अतुल कोकाटे (चिंचवड).

 

सर्व विजेत्या संघाचे मा. विजूशेठ जगताप यांनी अभिनंदन केले, व पराभुत संघांचे स्पर्धेत सहभागी झाले त्याबदल सर्वांचे आभार मानले.

🎤स्पर्धेमध्ये प्रशांत आदवडे सर,चंदु शेटे सर, प्रविण गायकवाड सर, मनोज बेल्हेकर सर, सुमित सोनवणे सर, आकाश धोत्रे सर व उत्तम सावंत सर या सर्वांनी दहा दिवस समालोचनातुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

स्पर्धेमध्ये Om Sai Pro Audio Dj ऑपरेटर सनी यांनी साऊंड सिस्टिम चे योग्य असे नियोजन केले होते. आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण Www.criclife.in अजयदादा दुधभाते,दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले होते,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला. या क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून अजय आवळे सर,संजय भालेराव सर,अक्षय निर्मल सर यांनी आपले योगाचे मोलदान दिले.

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक अजयदादा दुधभाते,मनिष कुलकर्णी निलेश विजुअण्णा जगताप आठ दिवस या स्पर्धे करीता खूप मेहनत घेतल्याने या स्पर्धाचा आनंद सांगवी, पिंपळे गुरव तसेच पिंपरी चिंचवडकरांना मनमुरादपणे घेता आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

61 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!