Google Ad
Uncategorized

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत आपली सर्व ताकद लावत असल्याचं दिसत आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत. सभेच्या ठिकाणीही उन्हाळा सुरू असताना मोठी गर्दी होतेय.वकार्यकर्त्यांची निष्ठा आणि आपल्या नेत्यावरचं प्रेम हे यातून दिसून येतं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये एक खास भेट मिळालीय.

देवेंद्र फडणवीस यांंना एका कलाकाराने आपल्या रक्तानं रेखाटलेलं चित्र पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान त्यांना भेट म्हणून दिलं. फडणवीसांनीही या कलाकाराचं कौतुक केलं. त्यासोबतच एक प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. आपल्या (ट्विटर) एक्सवर त्यांनी फोटो शेयर केला. माझ चित्र रेखाटण्याऐवजी रक्तदान करा, असा सल्ला फडणवीसांनी दिला. पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे असं या कलाकाराचं नाव आहे.

Google Ad

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंढरपूरचा पियुष शैलजा गिरीश हत्तीगोटे याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेले चित्र मला आज पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान भेट दिलं आहे. मी त्याचा मन:पूर्वक आभारी आहे. पियुष तू भेट दिलेले चित्र अतिशय उत्तम, यात वाद नाहीच. कला म्हणून मी त्याचा सन्मानच करतो. पण, माझी यानिमित्ताने एक विनंती सर्वांना आहे, तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा, मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनेकांची आयुष्य वाचवण्याच्या कामी हातभार लागेल. आपले रक्त समाजासाठी अर्पित करणे, हीच आपली संस्कृती आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच माझ्यावर दाखविलेल्या या प्रेमाबद्दल फडणवीस यांनी पियुषचे आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!