Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Shut Down : पिंपरी चिंचवड शहराचा १ एप्रिल रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३० मार्च ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे , सेक्टर क्र .२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे …

गुरूवार दि .०१ / ०४ / २०२१ रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे . दि .०१ / ०४ / २०२१ रोजी म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल . त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही .

Google Ad

दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस – या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि .०२ / ०४ / २०२१ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे . तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन म.न.पा.स सहकार्य करावे, असे आवाहन सहशहर अभियंता ( पापु ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!