Google Ad
Editor Choice

Shut Down : पिंपरी चिंचवड शहराचा १३ ऑक्टोबर रोजी या भागात होणारा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील जल उपसा केंद्रातील मुख्य पाईप लाईनचे लिकेज काढायचे काम तातडीने हाती घ्यावयाचे असल्यामुळे गुरुवार दि . १३/१०/२०२२ रोजी शरीरातील थेरगाव ग्रॅव्हीटी व रावेत- किवळे ग्रॅव्हीटी वरील सर्व भाग- थेरगाव , काळेवाडी , विजयनगर , रहाटणी , वाकड , पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन टाकीवरील भाग , पिंपळे निलख , विशालनगर , पुनावळे , ताथवडे , रावेत ,

सेक्टर २९ च्या टाकीवरील भागासह , किवळे , मामुर्डी , विकासनगर , जिल्हा रुग्णालय व उरो रुग्णालय सांगवी , बालेवाडी स्टेडियम , निगडी प्राधिकरण , से.क्र .२१ ते २८ आकुर्डी , खंडोबा माळ , मोहननगर , रामनगर , संभाजीनगर , शाहूनगर , कृष्णानगर , इंद्रायणीनगर , पांजरपोळ , सेक्टर १२ बो-हाडेवाडी , मोशी , डुडुळगाव , च-होली , वडमुखवाडी , चोविसावाडी , जाधववाडी , कुदळवाडी , फुलेनगर , शिवतेजनगर , पूर्णानगर , शरदनगर , सुदर्शननगर , नेवाळे वस्ती , हरगुडेवस्ती, पवार वस्ती रुपीनगर , चिखली या भागातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे .

Google Ad

दि . १३/१०/२०२२ रोजी या भागांमध्ये म.न.पा. मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल . त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील उपरोक्त भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही . दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील उपरोक्त भागात दुस – या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि . १४/१०/२०२२ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होईल . तरी नागरिकांनी म.न.पा. कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून म.न.पा.स सहकार्य करावे ही विनंती सह शहर अभियंता पाणी पुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!