Google Ad
Editor Choice

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार महंमद रफी शेख यांना जाहिर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३नोव्हेंबर) : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅक स्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि सिनेमा अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे.  संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त   विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ‘कलाभूषण पुरस्कार’देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी दिली. 

अधिक माहिती देताना योगेश सुपेकर म्हणाले, ज्येष्ठ कलावंताना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आणि युवा कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही कलाभूषण पुरस्काराने गौरविणार आहोत.  यामध्ये ऑर्केस्ट्रा क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे महंमद रफी शेख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालिका क्षेत्रातील पदार्पणाबद्दल अभिनेत्री गिरिजा प्रभू, मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, सिनेमा क्षेत्रासाठी शिवराज वाळवेकर, संगीत क्षेत्रातील युवा पुरस्कार अविनाश उर्फ बबलू खेडकर, संजय फलफले, तसेच स्वर्गीय गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड क्षेत्रातील पुरस्कार सचिन शिंदे, अझरुद्दीन अंसारी, नृत्यक्षेत्र  कामिनी गायकवाड, संगीत लोकनाट्य क्षेत्र सविता अंधारे, प्रनोती  कदम, तसेच तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल हसन शेख पाटेवाडीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिलिंद कुलकर्णी, अविनाश घुले आणि  निरजा आपटे यांना गौरविण्यात येणार असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

Google Ad

हा पुरस्कार वितरण सोहळा  ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न होणार आहे. यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत सर्वप्रथम गणेश वंदना, नांदी, यानंतर पारंपारिक  लावणी यांचे सादरीकरण होणार आहे. यानंतर  ११ ते दुपारी २ या वेळेत गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर, संगीतकार बप्पी लहरी यांना गाण्यातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रवेश विनामूल्य असणार आहे. या पुरस्कारांचे वितरण , संस्कृती कलादर्पण च्या अर्चना नेवरेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,  लीना बाळा नांदगावकर, अनुराधा शिंदे, नीलिमा लोणारी, अश्विनी दरेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद -भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचेही योगेश सुपेकर यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!