Google Ad
Editor Choice

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे, काय म्हणाले ‘एकनाथ शिंदे’ … तर बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : आज आषाढी एकादशी असून, या एकादशीला अत्यंत महत्व आहे.या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं. श्री विठ्ठल समस्त वारकरी सांप्रदायिकांसह सर्वांचेच आवडते दैवत असल्याने कोरोनाच्या अडसरानंतर यंदाची एकादशी भाविकांसाठी उदंड उत्साहाची ठरणार आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर इथं गेल्या आहेत.

दरम्यान, आज (रविवार) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. यंदा आषाढीला कोविड-19 नियमांचं बंधन नव्हतं. तब्बल दोन वर्षांनी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी भावूक झाले. दिल्ली दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री पुणेमार्गे पंढरपूरमध्ये पोहोचले. रात्री 2 वाजता मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहातून विठ्ठल मंदिराकडे निघाले. पहाटे अडीच वाजता महापूजेला सुरुवात झाली. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य कुटुंबीयही उपस्थित होते.

Google Ad

4 पिढ्यांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता शिंदे हसतमुखानं म्हणाले, हे भाग्य सर्वांनाच मिळावं. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदेंसह त्यांचा मुलगा आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा 4 पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४ पिढ्यांनी दर्शन घेतलेले बहुधा पहिले मुख्यमंत्री असावेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा हा अनोखा योगायोग मानावा लागेल.

▶️काय म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. आज पाऊस सुरू आहे, माझ्या राज्यातील बळीराजा सुखावला पाहिजे. कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टीची दुर्घटना घडू नये. एवढेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांसोबत बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हेच साकडे मी विठ्ठलाकडे घातले,” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.

▶️बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

महापूजेला मानाचे वारकरी होण्याचा मान बीड जिल्ह्यातील नवले दाम्पत्याला मिळालाय. मुरली नवले (वय ५२) आणि जिजाबाई नवले (वय २७) हे गेवराई तालुक्यातील रूई गावातील आहेत. गेल्या २० वर्षांपासून नवले दाम्पत्य पंढरीची वारी करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!