Google Ad
Editor Choice Maharashtra

रोहित पवारांनी केली ‘ही ‘ मागणी … पार्थ नंतर रोहित च्या चर्चेला उधाण!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील राजकारणात सध्या पवार कुटुंब हे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यावरून सुरु झालेला वाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवरून मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Google Ad

दरम्यान, पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून मंदिरे खुली करता येणार नसल्याचे म्हटले होते. आता असे असतानाच महाविकास आघाडीचे नेतेच जर मंदिरे खुली करण्याची मागणी करत असतील तर यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!