Google Ad
Editor Choice Pune

Pune : मृत बलात्कार पिडीतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यास नाकारणे मुलभुत मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही ची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : हाथरस उत्तरप्रदेश मधील बलात्कार पिडीतांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करु देण्याचा मुलभुत मानवी हक्क नाकरणाऱ्या उत्तरप्रदेश पोलिसावर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पुणे जिल्हा अधिकारी मा.राजेश देशमुख यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे . स्वतः मा. पंतप्रधान व मा. मुंख्यमंत्री उत्तरप्रदेश यांनी हाथरस ‘सामूहिक बलात्कार’ प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या हाथरस ‘सामूहिक बलात्कार’आरोपींची नावे सांगू नये म्हणून पिडीतेची जीभ कापली ही अतिशय अमानवी क्रुरकृत्ये झाले असताना पोलिसांनी प्रथम खबरी अवाहाल नोंद करण्यापासून ते दिल्ली रुग्णालयात पिडीताच्या उपचाराकरीता घेवून जाण्यापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी कर्तव्यात कसूर केला आहे. याची संपुर्ण चौकशी करुन दोषी पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच संबधित प्रकरणातील पिडीताचा मृत्यु झाल्यावर रुग्णालयातून पोलिसांनी नातेवाईकांना विश्वासात न घेता मृतदेह ताब्यात घेवून परस्पर अंत्यसंस्कार करने हे मुलभुत मानवी हक्काचे उल्लंघन आहे.

Google Ad

मागासवर्गीय मुली महिला यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी करुन जलदगती न्यायालयातून कामकाज चालवून क्रुरपध्दतीने बलात्कार करुन अमानवीय यातना देणाऱ्यावर नराधमांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्फत केंद्र शासनाला निवेदन देवून केली आहे. यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, आण्णा जोगदंड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष , संजय कांबळे महाराष्ट्र संघटन सचिव, सतिश चव्हाण पुणे शहर संघटक सचिव उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!