Google Ad
Editor Choice Education Maharashtra

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती … अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी पर्यंत करता येणार अर्ज!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती करण्यात येत असून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुभा दिली आहे. या पदांसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Google Ad

नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत रेग्युलर बेसिसच्या आधारे ही पदे भरली जाणार आहेत. यात टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) साठी 23 पद, टेक्निशिअन (फिटर), टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) आणि टेक्निशिअन (रेफ्रिजरेशन) या पदासांठी ही भरती केली जात आहे. या पदांसाठी 18 ते 25 ही वयोमर्यादा निश्चित केली आहे.


इच्छूक उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय एनसीव्हीटी आणि एससीव्हीच्या मान्यता प्राप्त संस्थांमधून इलेक्ट्रिकल, फिटर, मेसन सारखी सर्टिफिकेट्स असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित उमेदवाराकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणे गरजेचे आहे. याकरिता कंम्प्युटर बेस्ड चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही होणार आहे. अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 400 रूपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना 150 रुपये नॉन रिफंडेबल शुल्क भरावे लागणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!