Google Ad
Editor Choice Entertainment Pimpri Chinchwad

ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ फुगेवाडी गावठाण तर्फ आयोजित प्रश्न मंजुषा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९मे) : ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ फुगेवाडी गावठाण तर्फ आयोजित प्रश्न मंजुषा गोडी अध्यात्माची या ऊपक्रमातील तीसर्‍या पर्वाला सुरवात होत आहे.

फुगेवाडी गावातील ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण व शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ हे सतत समाजप्रती जागृती करण्यासाठी छोटे ऊपक्रम राबवतात, किल्लोत्सव स्पर्धा, शिववंदाना प्रचार प्रसार,ज्ञानेश्वरी ओवीं व अभंग प्रसार,अशे अनेक ऊपक्रम या परिवाराने राबवले,तसेच परिवारा तर्फ दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेतली जाते.अशातच दोन्ही परिवारांनी मिळुन नविन ऊपक्रम हाती घेतला तो म्हणजे प्रश्न मंजुषा गोडी अध्यात्माची अधिष्ठाण ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथ जयंतीचा मुहूर्त साधुन हा ऊपक्रम सुरु केला पहिल्यांदा ज्ञानेश्वरी या ग्रंथावर प्रश्न मंजुषा घेण्यात आली.

Google Ad

त्यास ऊदंड प्रतिसाद मिळाल्या नंतर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज,जगदगुरु संत तुकाराम महाराज, तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांवर निवृत्ती ज्ञानबंधु प्रश्न मंजुषेचा समारोप झाला व प्रथम चार स्पर्धकांना ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा देण्यात आली.दुसर्‍या पर्वा मध्ये हिंदुधर्म ग्रंथ, संत साहित्य,गीता रामायण महाभारत, व योगायोगाने शिवजयंती दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांच्या चरित्रावर आधारित प्रश्न मंजुषा घेऊन दुसर्‍या पर्वाचा समारोप केला.

प्रश्न मंजुषे मध्ये सर्वांना मोबाईल वरतीच प्रश्न पाठवले जातात, ही प्रश्न मंजुषा प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या रविवारी सुरु होते व एक आठवडा चालते यामध्ये रोज चार प्रश्न व चार पर्याय असतात. १५/५/२०२१ रोजी तिसर्‍या पर्वाला सुरवात झाली.तिसर्‍या पर्वामध्ये आचरण व योगदान हिंदुधर्माचे हा विषय प्रश्न मंजुषेसाठी घेऊन सेवेला आरंभ केल तरी दोन्ही परिवाराच्या वतिने आव्हान करण्यात येते कि अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होऊन याचा आनंद घ्यावा यामध्ये भाग घेण्यासाठी ७७४३८८५५१० ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण या क्रमांकावर आपले नाव,व पत्ता हा संदेश पाठवुन आपण भाग घेऊ शकता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!