Google Ad
Editor Choice Pune

Pune : राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला … कोरोना आजाराने दिवंगत झालेल्या शहीद पोलिसांच्या कुटूंबियांना दिला ५० लाख रुपयांचा धनादेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविड -१९ मुळे निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थीतीत पोलीस दल हे नाकाबंदी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग , प्रतिबंधित दोत्रातील बंदोबस्त , मारक कारवाई , लोकांमध्ये जनजागृती तसेच सोशल पोलिसींग अशा प्रकारची कर्तव्य व इतर जबाबदारी खंबीरपणे पार पाडत होते व आहेत. पुणे शहर पोलीस दलामध्ये पहिले कर्मचारी दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्ग बाधित आढळले , तेव्हा पासुन आजतागायत कोरोना बाधितांची एकुण संख्या १,३३६ अशी झालेली असुन एकुण ४० कर्मचारी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत व आजपर्यंत एकुण ०८ कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

अशा प्रकारे कोविड -१९ मध्ये पोलीस समाजाचे रक्षणासाठी झटणा – या पोलीसांची सुरक्षा व त्यांचे मनोबल वाढविण्या साठी महाराष्ट्र शासनाने शासन सानुग्रह अनुदान ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते . त्यानुसार पुणे शहर पोलीस दलातील दिवंगत कर्मचारी सुरेश सिताराम दळवी , वय -५६ वर्ष हे वाहतुक शाखा , पुणे शहर हे सिंहगड रोड वाहतुक विभाग येथे ड्युटी अंमलदार म्हणुन कर्तव्य करीत होते व दिनांक ०७ / ० ९ / २०२० रोजी शहीद झाले आहेत.

Google Ad

पोलीस हवालदार विनोद विश्वनाथ पोतदार , वय ५१ वर्षे , वानवडी पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन येथे चौकी अमलदार म्हणुन कर्तव्य करीत होते व दिनांक १७ / ० ९ / २०२० रोजी शहीद झाले होते . तसेच भगवान रामचंद्र निकम , वय ५५ वर्षे , नेमणुक विशेष शाखा हे एस्कॉर्ट विभागात कर्तव्य करीत होते . व ते दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी शहीद झाले असुन या सर्वांना महाराष्ट्र शासनाकडुन शासन सानुग्रह अनुदान मंजुर झाले आहे . आज रोजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहर यांचे हस्ते या सर्व दिवंगत कर्मचारी यांचे नातेवाईकांना शासन सानुग्रह अनुदानाचे धनादेश सुपूर्त करण्यात आले.

यावेळी शहीद कर्मचारी क्रमांक यांच्या पत्नी श्रीमती सुष्मा सुरेश दळवी , श्रीमती सुरेखा विनोद पोतदार व श्रीमती शुभांगी भगवान निकम यांनी पोलीस आयुक्त यांचे कडुन सदरचे धनादेश स्विकारले . सदर वेळी रविंद्र शिसवे , पोलीस सह आयुक्त , जालींदर सुपेकर अपर पोलीस आयुक्त प्रशासन , अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे व डॉ . संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर व इतर वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!