Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीत झाली होती सव्वा सहा लाखाची चोरी … घर कामगारच निघाला चोर!

महाराष्ट्र 14 न्यूज : मागील आठवड्यात नवी संगवीत सव्वा सहा लाख किमतीचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली त्याची फिर्याद फिर्यादी संगीता कांकरिया यांनी उशिरा सांगवी पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तपस सुरू केला. आपल्याच घरात केअरटेकर म्हणून एक मुलगा काम करत होता , त्यानेच हा प्रकार केल्याचे यावेळी उघड झाले.

नवी सांगवीत केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या या चोरट्याने घरातील २४ तोळे सोने व २० हजारांची रोकड लंपास केली होती . त्याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . नवी सांगवी क्रांती चौक येथी राहणाऱ्या संगीता अजित कांकरिया यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . त्यांनी घरातील सदस्य व घरकाम करणाऱ्या महिलांकडे चौकशी केली .

Google Ad

चौकशीदरम्यान संगीता कांकरिया व त्यांच्या मुलाने सांगितले , की २० सप्टेंबर रोजी चोरीस गेलेले दागिने कपाटात ठेवले होते . याचदरम्यान त्यांच्याकडे घर कामास असलेला केअरटेकर मुलगा काम सोडून गेल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे पोलिसांचा या गोष्टीचा संशय बळावला . पोलिसांनी मुलाचे मोबाईल लोकेशन तपासले असता , तो शहरात असल्याचे कळाले .

त्याच्या फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व संपर्क वाढवून भेटण्याची वेळ ठरवली . त्यानुसार तो कल्पतरू चौकात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली . संदीप भगवान हांडे ( वय २५ , रा . वाल्हेकरवाडी ; मूळ- पिंपरखेडा , जि . औरंगाबाद ) असे त्याचे नाव आहे . त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली . त्याच्याकडून २४ तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये हस्तगत केले . असे सांगवी पोलिसांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

23 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!