Google Ad
Editor Choice Maharashtra Pune

बनावट ऑनलाईन भाडेकरार … नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा कारभार चव्हाट्यावर!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ‘ ओपन पोर्टल’द्वारे कोणत्याही नागरिकांना ऑनलाइन भाडेकरार करण्याची केलेली सुविधा ही घरमालकांच्या मुळावर आली आहे . या सुविधेची संधी साधून ‘ फोटोशॉप’द्वारे बनावट भाडेकरार तयार केल्याचे गैरप्रकार पुणे आणि मुंबईमध्ये उघडकीस आले आहेत . या बनावट भाडेकराराद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( आरटीओ ) हजारो वाहनांची खरेदी करण्यात आली असल्याने ही व्यवस्था या विभागाच्या अंगलट आली आहे .

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी ‘ आय सरिता ‘ प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन लिव्ह अँड लायसन्स भाडेकराराची पद्धत अंमलात आणली . हीच योजना भाडेकरार पद्धत घरमलकांच्या मुळावर आली. कमी खर्चात ऑनलाइन भाडेकरार घरबसल्या होत असल्याने नागरिकांचा कायदेशीर दस्त करण्याकडे कल वाढला . परंतु बोगस भाडेकरार वाढल्यामुळे सरकारने ऑनलाइन भाडेकरारासाठी सेवा पुरवठादार ( एएसपी ) च्या नियुक्त्या केल्या .

Google Ad

शैक्षणिक अटी – शर्ती आणि २५ हजार रुपये अनामत रकमेचा धनादेश घेऊन परवाना देण्यात आला . त्यानुसार सर्व्हिस प्रोव्हायडर सूचनांचे पालन करून ऑनलाइन भाडेकरार नोंदणी करीत होते . लॉकडाउन कालावधीत भाडेकराराची ऑनलाइन सुविधा सर्वांसाठी खुली केली . परंतु , बोगस दस्त करणारी टोळी सक्रीय असल्याबाबत तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांना दिली होती .

राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवून बोगस ऑनलाइन भाडेकरार दस्त करण्यात येत असून , त्याबाबतचे पुरावे असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने नोंदणी महानिरीक्षक यांना पाठवले आहेत . बोगस ऑनलाइन भाडेकरार करणारी एक टोळीच सक्रिय असल्याचा आरोप करण्यात आला आहे . त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून चौकशी होण्याची गरज आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!