Google Ad
Editor Choice india political party

Dilhi : भाजपचेच खासदार म्हणाले … `राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे, उलट राजीव गांधींचे योगदान मोठे`

महाराष्ट्र 14 न्यूज : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणात पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे, असे वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिरासंदर्भात भाष्य केले. यावेळी स्वामी यांनी म्हटले की, राम मंदिरासाठीचा सर्व युक्तिवाद आणि चर्चा आम्ही केल्या. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी परवानगी दिली.

Google Ad

या निर्णयासाठी सध्याच्या सरकारने विशेष असे काही केलेच नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. तसेच राम मंदिराचा अजेंडा पुढे रेटण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंह राव आणि विहिंपच्या अशोक सिंघल यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. उलट अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती. अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता

याशिवाय, राममंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना भूमिपूजन सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे भाजपमध्येच कुजबुज सुरु आहे. अशातच आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या या विधानामुळे मोदी सरकारविरोधातील वातावरण आणखीनच तापणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!