Google Ad
Editor Choice Maharashtra

A.Nagar : मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा विखेंचा इशारा

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबई महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही , मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत . शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाडया खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही , तुम्ही जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात , आता केवळ बैठकांचा फार्स करू नका . दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल , असा इशारा माजी मंत्री आ . राधाकृष्ण विखे यांनी दिला .

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील नगर – मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला . नगर मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले . दूध उत्पादकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन आ . विखे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले .

Google Ad

या आंदोलनात मुकुंदराव सदाफळ , सचिन तांबे . बापूसाहेब आहेर , उसहभागी झाले होते . दूध अनुदानाच्या या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे आ . विखे यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले . बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलिसांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे , अण्णासाहेब म्हस्के , गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांच्यासह ३० जणांविरुद्ध गुन्हा केला आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!