Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : किडनॅपींग करुन गणीभाई बोलतोय असे म्हणुन बिल्डरकडे खंडणी मागणारा गणीभाई व त्याचा साथीदार खंडणी विरोधी पथकाकडुन जेरबंद

महाराष्ट्र 14 न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा करत असताना गुन्ह्यातील फिर्यादी यांना किडनॅपर वेगवेगळ्या मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करत होते . आरोपी ज्या मोबाईल वरुन फोन करत होते . त्या मोबाईलचे खंडणी विरोधी पथक अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण करुन व कौशल्यपुर्ण तपास करुन किडनॅपींग करणारा प्रमुख आरोपी नामे आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणी भाई वय -२९ वर्ष रा.भिमज्योत मित्र मंडळाजवळ , सर्व्हे नं .१२ , लक्ष्मीनगर , येरवडा पुणे -०६ यास ताब्यात घेतले.

Google Ad

त्याचेकडे तपास केला असता राहुल बाळु घोरपडे वय -२२ रा.सदर व इतर दोन साथीदार व माथाडीचे काम करणारा यांचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली . केल्याचे सांगितले.यातील आरोपी १ ) आकाश सुग्रीव घोडेस्वार वय -२ ९ वर्ष रा.भिमज्योत मित्र मंडळाजवळ , सर्व्हे नं .१२ , लक्ष्मीनगर , येरवडा पुणे -०६ २ ) राहुल बाळु घोरपडे वय . २२ वर्षे , रा . सदर यांना खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले आहे .

वरील कामगिरी ही गुन्हे शाखेचे मा . अपर पोलीस आयुक्त सोा . श्री . अशोक मोराळे सो , पोलीस उप आयुक्त , श्री . बच्चनसिंग सो .. , सहा . पोलीस आयुक्त श्री . लक्ष्मण बोराटे सोा , यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक श्री . बालाजी पांढरे , पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड , पो.अंमलदार प्रदिप शितोळे , विनोद साळुके , विजय गुरव , शैलेश सुर्वे , सचिन अहिवळे , सुरेंद्र जगदाळे , संग्राम शिनगारे , प्रविण पडवळ यांनी केलेली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!