Google Ad
Editor Choice Pune

Pune : मौजमजेसाठी महागडया सायकली चोरी करुन ओएलएक्सवर व परस्पर विकणा – या बंटी बबलीला येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथक कडून अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पोशि समीर भोरडे , पोशि सुनिल नागलोत व पोना किरण घुटे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , वाडीया बंगला समोर पुणे नगर रोडवर येरवडा पुणे येथे एक संशयीत मुलगा व एक मुलगी असे दोघे त्यांच्या ताब्यातील तीन सायकली तेथील येणा – या जाणा – या लोकांना विकत असल्याचा प्रयत्न करत आहेत .

सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी सपोनि समीर करपे , पोशि समीर भोरडे , पोशि सुनिल नागलोत , पोना किरण घुटे , अमजद शेख , नवनाथ मोहिते , अनिल शिंदे , राहुल परदेशी , मपोशि शामा देवकर यांनी त्यांना सदर ठिकाणी जावून एक सज्ञान महिला व एक विधीसंघर्षित बालक यांचेकडे तीन सायकलींची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे . सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं .४८ / २१ भादवि ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . गुन्हयातील चोरीस गेलेल्या ४१,५०० / – रु किंमतीच्या ३ सायकली व इतर ३ महागडया सायकली अशा एकूण ६ महागडया सायकली ताब्यात घेवून जप्त करण्यात आलेल्या आहेत . विधीसंघर्षित बालक व महिला आरोपी सायकली चोरुन ओएलएक्सवर व परस्पर सायकली विकून मौजमजा करत असल्याचे कबूल केले आहे .

Google Ad

सदरची कामगिरी मा . पंकज देशमुख साो , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -४ , किशोर जाधव साो , सहा . पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , श्री . युनुस शेख , वपोनि येरवडा , श्री . अजय वाघमारे , पोनि गुन्हे , येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि समीर करपे , पोहवा गणपत थिकोळे , पोना गणेश वाघ , सुनिल नागलोत , समीर भोरडे , किरण घुटे , नवनाथ मोहिते , अमजद शेख , अनिल शिंदे , राहुल परदेशी , सुनिल सकट , शामा देवकर यांनी केलेली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

151 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!