Google Ad
Editor Choice

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी … तर इकडे इच्छुकांचा खर्च पाण्यात जाणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ मार्च) : नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पुणे शहरातील मेट्रोचे उद्घाटन तसेच महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर एमआयटीच्या ग्राउंडवर मोदी हे सभा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. आज महापालिका, जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेण्यात आला.

Google Ad

▶️ इच्छुकांचा खर्च पाण्यात जाणार

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची दावेदारी करण्यासाठी शेकडो इच्छुकांनी शहरभर फ्लेक्‍स आणि बॅनरबाजी केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामुळे महापालिकेने या अनधिकृत जाहिराती तसेच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!