Google Ad
Editor Choice

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा … उपमुख्यमंत्री करणार स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मार्च) : येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी राजशिष्टाचारानुसार पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. परंतु, फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करणे म्हणजे शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. या विरोधात पुणे राष्ट्रवादीकडून ६ मार्च रोजी आंदोलनही करण्यात येणार आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!