Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बदनामी प्रकरणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने पोलिस आयुक्तांकडे केली ही मागणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१मे) : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार भोसरी पोलिस ठाण्यात भाजपचे नगरसेवक राजेंद्र किसनराव लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी राजेंद्र लांडगे यांना अटक करण्यात आली आहे.

परंतु, त्यांच्या अटकेनंतर भाजपच्या वतीने सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी अपप्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. भाजप नगरसेवक यांच्या विरोधात प्राधिकरणाकडून देण्यात आलेली तक्रार आणि पोलिसांकडून झालेली कारवाई या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा आमच्या नेते अजितदादा पवार यांचा कोणताही संबध नाही.

Google Ad

ही कारवाई पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची आहे. तरी देखील फसवणुकीसारख्या आर्थिक गुन्ह्याचे समर्थन करत भाजपकडून बदनामी, अपप्रचार सुरू आहे. या पध्दतीने बदनामीकारक मजकूर विविध माध्यमातून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रसिध्द करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संजोग वाघेरे पाटील शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे करण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!