Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दापोडी येथे कोरोनाच्या व गणेशोत्सवाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘गणराया पुरस्कारा’ने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६सप्टेंबर) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा दापोडी विभागाच्यावतीने गणेश उत्सव काळामध्ये आरोग्य कर्मचारी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी जे उल्लेखनीय काम केले अशा मान्यवरांचा सत्कार माननीय स्वाती माई काटे (नगरसेविका पिंपरी चिंचवड) व अस्मिता ताई कांबळे(राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड महिला उपाध्यक्ष) यांच्या शुभहस्ते मान्यवरांना गणराया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुभाष जाधव, चंद्रकांत सोनवणे, सुनील चव्हाण, रमा बाराते, राजाराम रागपसरे, दीपक जिथेथोर, प्रकाश खंडागळे, आनंद कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माननीय रमेश भोसले मुख्य सहाय्यक आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी तसेच जयवंत मोरे, सुभाष शहा, आशिष जाधव यांचा स्वाती उर्फ माई काटे (नगरसेविका पिंपरी चिंचवड) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Google Ad

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नगरसेविका माई काटे म्हणाल्या, ‘आज खरोखरच आरोग्य कर्मचाऱ्यांनी जे काम केले ते खूप उल्लेखनीय आहे, आणि अशा कामामुळे आपला परिसर तसेच संपूर्ण प्रभाग स्वच्छ राहिले आणि या स्वच्छतेमुळे रोगराई कमी होण्यास मदत झाली. तसेच कोरोनाची कुठली भीती न बाळगता आरोग्य व पत्रकार या बंधूंनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता खरोखरच खुप असे महान काम केले म्हणून त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.

या कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!