Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेचे ‘ We – YUVA ‘ चॅलेंज ‘… We – YUVA च्या विजेतीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एका दिवसाचे आयुक्त होण्याची संधी! … वाचा, सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.८ मार्च २०२१) : पिंपरी चिंचवड शहरी प्रशासनातील महिलांचा सहभाग केवळ वाढविण्यासाठी नाही तर महिलांना समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ We – YUVA ( Youth urban Vision Accelerator ) चॅलेंज सुरू केले आहे . यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या ‘ Choose to Challenge ‘ थीममधून प्रेरणा घेत , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरी प्रशासनात स्त्री शक्तीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे . हे आव्हान 18-25 वर्षे वयोगटातील सर्व महिलांसाठी खुले असणार आहे .

पिंपरी चिंचवड शहराला २०३० पर्यंत ‘ भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी , शहर परिवर्तनाच्या कोणत्या मुद्द्याकडे लक्ष व विकासाच्या कोणत्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची गरज आहे याविषयी व्यक्त होण्याचे व्यासपीठ या निमित्ताने महिलांना उपलब्ध होणार आहे या चॅलेंजच्या विजेतीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एक दिवसासाठी ‘ आयुक्त होण्याची संधी मिळणार आहे . सध्याच्या कोरोना काळातही महिलांनी विविध आघाड्यांवर काम करत आहेत . सार्वजनिक आरोग्य जपणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स पासून आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत अगणित महिला कोविड १९चा पराभव करण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करत आहेत .

Google Ad

महिलांना प्रशासकीय अधिकार , निर्णय घेणे तसेच या नियमांची अंमलबजावणी करणे या सर्वच पातळ्यांवर सामान अधिकार मिळावेत व कोठेही लिंगभेदाचा सामना करायला लागू नये यासाठी प्रशासकीय कामकाजाची संरचना आणि प्रणालीमध्ये बदल करणे गरजेचे आहे . याच निकांच्या आधारावर ” We – YUVA ‘ चॅलेंजची निर्मिती करण्यात आली आहे , ज्यामुळे महिला केवळ योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सहभागी ना होता , योजनेच्या संकल्पना निर्मितीपासून या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील . सन २०३० पर्यंत देशातील सर्वसमावेशक , आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि राहण्यायोग्य शहर बनविण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ध्येय साध्य करण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करताना कोणत्या पद्धतीचा वापर करावा हे या आव्हानाच्या माध्यमातून महिलांना सुचवता येईल .

सन २०३० पर्यंत देशातील सर्वसमावेशक आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि राहण्यायोग्य शहर बनविण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे परिणामकारक धोरणाचा नागरिक हा केंद्रबिंदु आहे . पिंपरी – चिंचवडने दीर्घकालीन विकासाचे धोरण अवलंबले आहे . त्याअंतर्गत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी १३ विषयांवरील ९ १ प्रश्नांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते . सुमारे १५ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला . या सर्वेक्षणाचा भर शहराचे ध्येय आणि दृष्टिकोन यावर होता , ज्यामध्ये नागरिकांना शहराबहल वाटणारा आपलेपणा , सहकार्य , विश्वास , आवड आणि किमान गरजांचा समावेश करण्यात आला होता .

या सर्वेक्षणातून शहराला आकार देणारे तीन महत्त्वाचे घटक पुढे आले . सिटी ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन घटकांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहभागी महिलांकडून त्यांच्या संकल्पना मराठी , हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये 600 शब्द जास्तीत जास्त अथवा २ मिनीटांचा व्हिडीओ अशा स्वरुपात मागवीत आहे . या आव्हानामध्ये सहभागी होणाऱ्या महिला या तीन घटनाकार आधारित त्यांच्या कल्पना , विचार किंवा अंमलबजावणीयोग्य उपाय क्यूआर कोड स्कॅन करून अथवा ( गूगल फॉर्म दुवा :

http://forms.gle/HYRBRZ1xBNEThuE29 किंवा [email protected] वर दि . २२ मार्च २०२ ॥ पर्यंत पाठवू शकता . तीन सिटी ट्रान्सफॉर्मेशन पुढीलप्रमाणे : 1. नोकऱ्यांचे भवितव्य : संशोधन आणि विकासाकडे वाटचाल करणाच्या औदयोगिक शहराच्या भविष्यासाठी नवीन पद्धतीची कौशल्ये , ज्ञान आणि क्षमता असणा – या कुशल मनुष्यबळाची असलेली गरज .

🔴आतापर्यंत हाती घेतलेले पुढाकारः . . .

शहराच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेले हॅकॅथॉन भविष्यातील कौशल्ये आणि तरुणांच्या रोजगारावर भर देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी फ्यूचर फेस्टिव्हल , जॉब फेअर / करिअर एक्सपो Start स्टार्टअप पीच फेस्ट , इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर , स्टार्टअप कल्चर , उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट – अप केंद्र कौशल्य , पुन्हा व्यवसाय आणि करिअर समुपदेशन केंद्र – कौशल्य आणि प्रशिक्षण गरजा ओळखण्यासाठी आणि तरुणांना असंघटित क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यात मदत .

🔴खेळ आणि आरोग्य :

खेळाच्या सर्वाधिक सुविधा आणि ठिकाणे असल्याने देशातील खेळाचे केंद्र ( हब ) म्हणून ओळखले जाण्याची क्षमता या शहरात आहे . . आतापर्यंत हाती घेतलेले पुढाकारः . सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अॅथलेटिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी म्युनिसिपल स्कूल स्पोर्टस लीग नागरिकांमध्ये फिटनेस जनजागृतीकरण्यासाठी सायक्लोथॉन / मॅरेथॉन फिट पीसीएमसी , आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या विषयांवर नागरिकांशी गुंतण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ • स्पोर्टस अकादमी , ऍडव्हान्स लर्निंग सेंटर जे विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधांचा समावेश करते , खेळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सार्वजनिक क्रीडा सुविधेचा अवलंब करण्यासाठी स्पोर्ट फॅसिलिटी अडॉप्शन लोकांना नॉन मोटराइज्ड वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हैप्पी स्ट्रीट

🔴नद्या : शहरातून वाहणाऱ्या परस्परांना जडलेल्या तीन नद्या . मुळा , पवना व इंद्रायणी . . . आतापर्यंत हाती घेतलेले पुढाकारः . . . .

नदी प्रदूषणाविषयी जनजागृतीनिर्माण करण्यासाठी नदी स्वच्छता व जागरूकता अभियान रोज वापरात येणारा प्लास्टिक कचरा कमी करण्यात मदत करण्यासाठी शून्य प्लास्टिक आव्हान नद्यांच्या साफसफाई व देखभालीसाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता अभियान जलसंधारण उपक्रमांद्वारे नद्यांचे व इतर जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रकल्प याप्रसंगी बोलताना बोलताना मा . महापौर उषा उर्फ माई ढोरे , म्हणाल्या , महिला सर्व क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करत आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी करतात . महिला सक्षमीकरण हे सर्व स्त्रोत , लोक , क्षेत्र आणि दृष्टीकोनातून येते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन , महिला सक्षमीकरणाच्या सामूहिक प्रयत्नांनी समर्थित आहे . आम्ही आशावादी आहोत की We – YUVA चॅलेंजमुळे महिलांना प्रशासनात सभागी होण्याचा वेगळा अनुभव मिळेल . ‘

श्री.राजेश पाटील , मा . महापालिका आयुक्त म्हणाले की , “ We – YUVA ही एक नवीन संकल्पना आहे जी तरुण महिलांचे नेतृत्वाचे स्वप्न साकार करेल . गेल्या वर्षभरात , आपण महिलांना सर्वच आघाड्यांवर अखंड क्षमतेने काम करताना पहिले आहे . कौटुंबिक असो वा व्यावसायिक जबाबदारी महिलांनी सर्वच आघाड्यावर आपल्यातील उपजत नेतृत्वगुणाने ती पार पडली आहे .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा असा विश्वास आहे की शहरी प्रशासनामध्ये महिलांचा सकारात्मक सहभाग वाढविणे हे अधिक महत्वाचे आहे . शहरी स्थानिक संस्था चालवण्यापासून ते देश चालविण्यापर्यंत – जगाला महिला नेत्यांची आवश्यकता आहे . लिंग 2/3 भेदाचा कोणताही प्रभाव नसलेला समाजच उत्तम भविष्याची मांडणी करू शकतो . याच बाबीचा विचार करून आम्ही १८ ते २५ वर्ष वयोगटातील महिलांकडून 2030 पर्यंत पिंपरी – चिंचवडला भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर बनवण्याच्या दृष्टीने संकल्पना मागवीत आहोत . “

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!