Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून कोरोनाच्या काळातील सर्वात मोठी कारवाई … अनधिकृत पत्रा शेडवर झाली कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘क’ क्षेत्रिय कार्यालय मधील मौजे चिखली ( प्रभाग क्र २ ) जाधववाडी , कुदळवाडी भागातील १८ मी देवराई डी .पी रोडलगत लगतच्या अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर आज दि ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.

सदर कारवाई मध्ये कुदळवाडी मधील गट नः२५६ ,२५७, २५८, २५९ येथील सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण ६८ अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १,४६ ,००० चौ .फूट पाडण्यात आली आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , उपायुक्त श्री मनोज लोणकर , सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच मा कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता सूर्यकांत मोहिते , हेमंत देसाई , सुधीर मोरे तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण ४८ बीट ऑफीसर तसेच सदर कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी सी पी सुधीर हिरेमठ व आनंद भोईटे. सहायक आयुक्त संजय नाईक पाटील , पी आय सतिष माने , दिलीप भोसले , शहाजी पवार , १० पी एस आय व १o५ पोलीस कर्मचारी व ३० एस आर पी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

Google Ad

सदर कारवाई साठी २ पोकलेन , ७ जेसीबी , २ क्रेन व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग मोठया ताफयासह उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात यापुढेही ठिकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असुन सदर पत्राशेड धारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारनुकसान टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!