Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त गोड भेट देणे बाबत ची महत्वाची बैठक आज दुपारी ३.०० वाजता मा. महापौर यांचे दालनात संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेणेत आला. कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देणेबाबत माननीय महापौर यांनी जाहीर केले. सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे ८.३३ % प्रथा बोनस व २० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिवाळी पुर्वी देणे बाबत ची अधिकृत घोषणा करण्यात आली. कोव्हिड- १९ सारख्या महाभयंकर रोगाच्या परिस्थितीमध्ये देखील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे काम केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. या उद्देशाने सदरचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व याबाबतचा सन २०२०-२०२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी चा करार कर्मचारी महासंघासोबत करणेत येणार असल्याचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.

Google Ad

सदर बैठकीतील निर्णयानंतर कर्मचारी महासंघाच्या वतीने आता पर्यंत कर्मचा-यांनी ज्या प्रमाणे चांगले काम केले आहे. त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भविष्यात देखील उत्कृष्ठ काम करणेबाबतची ग्वाही अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी  देऊन महापालिकेचा नावलौकीक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व कर्मचारी कटीबद्ध असतील अशा प्रकारची भुमिका महासंघाच्या वतीने मांडली तसेच सदर निर्णयाचे स्वागत करून सर्व पदाधिका-यांचे, मा. आयुक्त व उपस्थितांचे आभार मानले.

सदर बैठकीस माननीय महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, जैवविविधता समिती अध्यक्ष उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, गटनेते सचिन चिखले, ब प्रभाग सभापती सुरेश भोईर,क्रीडा सभापती उत्तम केंदळे, सन्माननीय नगरसदस्य संदीप वाघेरे, नगरसदस्य विनोद नढे,

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप साहेब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे साहेब, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले,कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर साहेब, प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, कायदा विभागाचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप साहेब, जनसंपर्क विभागाचे अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!