Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांची धनवंतरी आरोग्य विमा योजना पुढील सुनावणी होई पर्यंत बंद करू नये … न्यायालयाने दिला अंतरिम आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचा-यांसाठी वरदायिनी असणारी धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून खाजगी विमा पॉलिसी चालू करण्याबाबतचा आदेश दिनांक ०४/०१/२०२१ रोजी पारीत करण्यात आलेला होता. धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात येऊ नये यासाठी महासंघाने वेळोवेळी आयुक्त यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता.

तथापि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांनी दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी एकतर्फी निर्णय घेतल्याने त्या निर्णयाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात संघटनेच्यावतीने दाद मागण्यात आली. महासंघाच्या वतीने मागणी केलेनुसार व सादर केलेल्या कागदपत्रानुसार न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत धन्वंतरी योजना बंद करण्यात येऊ नये. असा अंतरिम आदेश दिनांक १९/०१/२०२१ रोजी पारित करण्यात आलेला आहे.पुढील सुनावणी दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे . असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ यांच्या वतीने अध्यक्ष अंबर किसनराव चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याची धन्वंतरी योजना चालू ठेवण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, याकरिता कर्मचारी महासंघ कर्मचाऱ्यांनो सामील व्हा असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे. म.न.पा. मुख्यालयासमोर बुधवार दि . २० जानेवारी २०२१ रोजी स . ० ९ : ०० ते सायं . ०७:०० हे एकदिवसीय लक्षणीक उपोषण होणार आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

215 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!