Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … बुधवार, १९ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १९ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.१९ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ७६२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९८० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यातील ४२ रुग्ण हे पिंपरी चिंचवड शहरातील तर १६ रुग्ण हे पिं. चिं. मनपा हद्दीबाहेरील आहेत.

▶️२० मे रोजी पिं. चिं. लसीकरण अपडेट्स

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज १९ मे रोजी ५८६९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या दि .२० / ०५ / २०२१ रोजी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही, याची पिंपरी चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरीकांनी नोंद घेण्यात यावी . या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद असलेने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व महापालिकेला सहकार्य करावे .

टीप :- पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!