Google Ad
Education Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा शालेय शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार … पोषण आहाराच्या पैशाची बचतगट पाहतायेत वाट!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.४ ऑगस्ट : शालेय शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांनी दोन वर्षांपासून शालेय पोषण आहार मध्ये काम करणाऱ्या बचत गटांचे स्वयंपाकी व मदतनीस याचे मानधनाचे पैसे शिक्षण विभागाकडे जमा झालेले असूनही अजुन दिलेले नाहीत.शालेय शिक्षण विभागाच्या खात्यामध्ये ते पैसे पडून असून ते पैसे देण्याची तजवीज शिक्षण विभाग का करत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिल २०१८ पासून फरकाची रक्कम भेटणार होती, पण ती रक्कम ही शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे अडकून पडली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाचा कसा भोंगळ कारभार चालू आहे हे उघड झाले आहे.

विभागाने बचत गटांकडून कडून जी काही कागदपत्रे मागवली ती वेळोवेळी विभागाला पुरवण्यात आली आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाची बचत गटांना पैसे देण्याची मानसिकता दिसत नाही. लॉक डाऊन मुळे बचत गटातील महिलांचे कंबरडे मोडले असताना बचत गट आपले हक्काचे पैसे कधी येतील या अपेक्षेने पैशांची वाट बघत बसले आहेत.परंतु शिक्षण विभाग काही हालचाल करताना दिसत नाही. ऑनलाईन पेमेंट प्रणाली सुरू झाल्यापासून विभागाकडून मुख्याध्यापकांच्या खात्यावर पैसे जमा होतात परंतु त्या रकमेमध्ये ही बराच फरक दिसून येत आहे, त्या बाबत विभागाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. बचत गटांना त्यांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावेत अन्यथा सर्व महिला बचत गटांचे प्रतिनिधी महापालिकेवर शिवसेना पद्धतीने मोर्चा काढून मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या विभाग संघटिका श्रीमती मंदा फड यांनी दिला आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!