Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे मागासवर्गीय प्रशिक्षणार्थ्याना उद्योजकता विकासाबाबत कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जानेवारी) : इंडो-जर्मन टूलरूम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी / कासारवाडी (मुं) येथील अनुसूचित जाती, प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्याना उद्योजकता विकासाबाबत जागृती करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा दि.२०/०१/२०२३ रोजी संपन्न झाली.

व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आत्मसात केलेल्या कौशल्याच्या जोरावर प्रशिक्षणार्थ्यानी नोकरीचा मार्ग न स्विकारता उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा, सकारात्मक उद्योजकीय मानसिकता, राज्य व केंद्र शासनाच्या व्यवसाय निर्मितीच्या सहाय्यक विविध योजनांची माहिती आंतरराष्ट्रीय ट्रेनर श्री. विकास भावसार यांनी प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन केले श्री. भानुप्रताप देशमुख यांनी इंडो – जर्मन टूलरूम मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कोर्सबाबतची सविस्तर माहिती दिली.

Google Ad

संस्थेचे प्राचार्य श्री.शशिकांत पाटील यांनी शहरामध्ये कुशल मनुष्यबळ घडविण्याबरोबरच उद्योजक घडवण्यासाठी संस्था व महानगरपलिका प्रयत्नशिल असल्याचे नमूद केले. तसेच महानगरपालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता उद्योजकता विकास व समन्वय केंद्र बनविण्याचा मानस व्यक्त केला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक श्री. सोनवणे व श्रीम. काराबळे तसेच निदेशक श्री.लांडगे, श्री.रेंगडे, श्री.अवधूत, श्री.कोकणे व श्रीम. कोंडे या निदेशकानी सहकार्य केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!