Google Ad
Editor Choice Education

12वी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार … अशा पद्धतीने डाउनलोड करा हॉल तिकीट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जानेवारी) : 12वी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार…

✍️ बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झाले आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. विद्यार्थ्यांना आजपासून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहे.

Google Ad

👉 बोर्डाच्या www.mahahssscboard.in या संकेतस्थळावर सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यास सुरुवात झाली आहे. संकेतस्थळावरील college login मध्ये जाऊन उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्रिंट करुन द्यावीत, असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

🌐 *अशा पद्धतीने डाउनलोड करा हॉल तिकीट..*

– सर्वप्रथम बोर्डाचे अधिकृत

http://www.mahahsscboard.इन या संकेतस्थळावर जा.
– पुढे अपडेट्सवर क्लिक करून ‘डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट 2022’ ही लिंक ओपन करा.
– त्यानंतर महा एचएससी 12 वी हॉल तिकीट हा पर्याय निवडा.
– तुमचे एचएससी हॉल तिकीट पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर, नाव किंवा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख टाकून एंटर करा.
– त्यानंतर तुमचे हॉल तिकीट ओपन होईल. येथून हॉल तिकीट डाऊनलोड करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!