Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दिवाळी प्रमाणे साजरा करा … पिंपरी चिंचवड भाजप चे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते भूमीपुजन सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या परिसरातील नागरिकांना घरी दिवे प्रज्वलीत करणे, गुढी उभारणे, घरावर पताका लावणे, रांगोळ्या काढणे तसेच सर्व कुटुंबियांसह मिळून टीव्हीवर हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोत्साहीत करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यामध्ये प्रभू श्री राम यांच्या जन्मभूमीत भव्य राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दि. ५ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. आपल्या जीवनातील हा सर्वात महत्त्वपूर्ण दिवस व्यक्तिगत रूपाने घरी कुटुंबियांसह दिवाळी प्रमाणे साजरा करा. हा सोहळा सामूहिकरित्या साजरा करणे मुख्यत्वे टाळा आणि कोरोना बाबत काळजी घ्या, असे आवाहन शहरातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

Google Ad

अयोध्येत श्री राम जन्मभूमीत भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी आपण सर्व एकजूट होऊन लढलो. त्याच राम मंदिराचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. मंदिराचा भूमिपूजन सोहळा आपण मोठ्या स्तरावर आणि धुमधडाक्यात साजरा करू शकलो असतो, मात्र कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन हा सोहळा व्यक्तिगतरित्या घरीच साजरा करावा. मंदिराचा भूमिपूजन सोहळा म्हणजे आपल्या घरातच सायंकाळी ७ वाजता दिवाळी आहे, असे समजून घरी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने साजरा करा. आपले घर दिव्यांनी प्रज्वलित करा, गुढी उभारा, आपापल्या घरावर कंदील-पताका लावा, रांगोळ्या काढा आणि सर्व कुटुंबियांसह मिळून टीव्हीवर हा कार्यक्रम पहावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने ४० ठिकाणी मिळून १० लाख लाडूचे वाटप नागरिकांना करण्यात येणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!