Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील ९०० रुग्ण आज कोरोना मुक्त ,तर ६२९ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. ४ ऑगस्ट २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ६२९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ९०० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज मृत झालेले १६ रुग्ण हे आकुर्डी (पुरुष ७९ वर्षे), चिंचवड (स्त्री ८६ वर्षे), निगडी (पुरुष ६६ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), कासारवाडी (स्त्री ४७ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ९८ वर्षे), किवळे (पुरुष ७० वर्षे), भोसरी (पुरुष ६८ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ४३ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५४ वर्षे), इंद्रायणीनगर भोसरी (पुरुष ७४ वर्षे), मोशी (पुरुष ५९ वर्षे), सांगवी (पुरुष ७७ वर्षे), तळेगाव दाभाडे (पुरुष ३५ वर्षे), देहुरोड (पुरुष ६५ वर्षे), म्हाळुंगे (स्त्री ६५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!