महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९मे) : श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवी गेले वर्षभर कोरोनाच्या संकट काळात परिसरातील नागरिकांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिर या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहे. न्यासाच्या या सामाजिक बांधिलकीतुन अनेक गरीब गरजूंना याचा लाभ झाला.
श्री गजानन महाराज न्यासाने गुरुवार २० मे पासून नवीन विनामूल्य अन्नदानाचा (भोजन) उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या गरीब गरजू कोरोना बाधित, होम आयसोलेशन रुग्ण आणि त्यांच्या परिवारासाठी सकाळ-संध्याकाळ विनाशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर योजनेनुसार ज्यांना मंदिरातून जेवण घेऊन जाणे शक्य आहे, त्यांनी मंदिरांमध्ये दुपारी १२ ते १ या वेळेत जेवण घेऊन जाणे (शासनाने प्रसिद्ध केलेल्या त्रिसूत्री चे पालन करूनच) तसेच ज्या परिवाराला घरपोच जेवण हवे आहे, त्यांनी मंदिरातील फोनवर संपर्क साधावा असे आवाहन गजानन महाराज न्यासाच्या वतीने सांगवी तसेच नवी सांगवी तील गरजू नागरिकांना करण्यात आले आहे. तरी कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या परिवारा संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
▶️योजनेचा लाभ घेण्याकरीता संपर्क :-
१) मंदिराचा फोन नंबर ०२०२७२८२०२१
२) श्री मधुकर हातलगे
९८२२५००५९८
३)श्री बाळासाहेब आरेकर
७२०८६४९४२९.
▶️टिप :-
१)न्यासातर्फे वरील योजना गुरूवार दि २०/५/२०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. याची सर्व लाभ धारकांनी नोंद घ्यावी
२)सदर वरील योजना हि सांगवी, नवीसांगवी परिसरातील लोकांसाठी मर्यादित आहे, असे श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवी यांनी कळविले आहे.
6 Comments