Google Ad
Editor Choice india

नितीन गडकरींनी सांगितला सोशल मीडियातुन कमाईचा आकडा … पहा, गडकरींना महिन्याला युट्युबमधून किती होते कमाई?

महाराष्ट्र 14 न्यूज : नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेदेखील कोरोनाच्या काळापासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाषणांमुळे युट्युबकडून दर महिन्याला पैसे मिळतात, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील विद्यापीठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाचा उपयुक्तता आणि आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल यावर मोकळेपणाने भाष्य केले. कोरोना संकटामुळे आयुष्यावर झालेला परिणाम तसेच स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला किती कमाई होते, अशा अनेक गोष्टींसंदर्भात विस्तृत चर्चा करत काही खुलासेही केले.

Google Ad

▶️ गडकरींना युट्युबमधून किती होते कमाई?
युट्यूबवरून जी भाषणे दिली, त्यासाठी आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजच्या घडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये दिले जातात. हे पैसे कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून दिले आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच कोरोना संकटाच्या कालावधीत आलेल्या अनेक अनुभवांवर पुस्तक लिहिले असून, या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजी प्रती प्रकाशित होण्याआधीच विकल्या गेल्या, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!