Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निबंध लागू ; काय सुरू ?, काय बंद ?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जून) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, हळुहळु महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेतील कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत असताना नागरिकांना निर्बंधामधुन सुट देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात अनलाॅकला सुरूवात करण्यात आली. पण आता महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे, त्यामुळे उद्यापासुन पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या टप्प्याच्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रेक द चैन अंतर्गत 04 जून 2021 रोजी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना पुढे सुरू ठेवण्या संदर्भातील निर्णय सरकारने लागू केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारने सांगितले आहे की, 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. नागरी विकास आणि ग्रामीण विकास विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार 4 जूनच्या आदेशानुसार सर्व नियम अस्तित्वात असणार आहेत.

Google Ad

त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु यात स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बदल करू शकते. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सर्व दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शनिवार व रविवार पूर्णतः लॉकडाऊन पाळण्यात येणार असून काही जिल्ह्यांमध्ये किराणा व भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

उद्यापासून लागू होणाऱ्या निर्बंधाबद्दल नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण स्थानिक प्रशासनाकडे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासन वेगळा वेगळा निर्णय घेत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांकडून संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट राज्य सरकारतर्फे एकच नियमावली जाहीर करावी व तेच नियम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. सरकार नेमकं यावर काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!